जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. अशातच मध्य रेल्वेने आणखी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष यामधील काही गाड्या जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबत आहेत. यामुळे जळगावकर प्रवाशांची सोय होणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी – सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११४९ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या ९ एप्रिल ते २३ एप्रिलदरम्यान दर बुधवारी भिवंडी येथून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खडगपुर येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन असतील.
ठाणे खडगपूर अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०११५० अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान दर शनिवारी खडगपूर येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला टाटानगर, चक्रधरपुर, राउरकेला, झारसुगुडा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा असेल.
या रेल्वेगाडीला १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन असतील. अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या आणि डब्यासाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे आरक्षित करता येतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.