⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | गुन्हे | जळगावच्या ऍड.अनिकेत निकम यांच्यामुळे मिळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन

जळगावच्या ऍड.अनिकेत निकम यांच्यामुळे मिळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । जळगावच्या ऍड.अनिकेत निकम यांच्यामुळे मिळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाला आहे. तर झाला अस कि, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून जे विधान केले होते देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले हे बाजूला विचारावा लागते ज्या व्यक्तीला ‘हिरक महोत्सव’ आहे का हे माहीत नाही, हे मुख्यमंत्री यांना कळत नसेल तर एखादा सेक्रेटरी बाजूला ठेवून बोलत जा, मी तिथे असतो तर कानाखाली मारली असती असे विधान करून राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले होते. त्या विधानामुळे धुळे शहर येथे राणे यांच्यावर विरुद्ध एफ.आय.आरची नोंद झाली होती.

नारायण राणे यांनी धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीनाचे कामकाज प्रधान न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या कोर्टात चालले. एड. जे.डी. सोनवणे सरकारी वकील यांनी राणे यांच्या अटकपूर्व जामीनास तीव्र विरोध केला. सुनवाई दरम्यान एडवोकेट अनिकेत निकम यांनी नारायण राणे यांच्या बाजूने युक्तिवाद केला जो की राणे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जी कलमे लावली सकृतदर्शनी ती कलमे लागू होत नाहीत व राणे यांच्या विधानामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत नाही. राणे यांचे विधान हे राजकीय हेतूने प्रेरित होते

त्यांचा कोणताही उद्देश तेढ निर्माण करणारा नव्हता त्यामुळे आशा स्वरूपाची कारवाई बेकायदेशीर आहे व अशा स्वरूपाच्या गुन्ह्यास कस्टडीची आवश्यकता नाही आणि त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास माननीय कोर्टाला विनंती केली. मेहरबान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून, एडवोकेट अनिकेत निकम यांचा व्यक्तिवाद ग्राह्य धरून धुळे कोर्टाने राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.