जळगाव लाईव्ह न्यूज । आठव्या वेतन आयोगाची दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या १ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) ला मंजुरी देण्यात आली आहे. या आयोगाचा फायदा सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, विविध मंत्रालये, राज्य सरकारे आणि कर्मचारी संघटनांशी व्यापक चर्चा केल्यानंतर आयोगाने टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली.यानंतर आता आयोग १८ महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल. जानेवारी २०२५ मध्ये, मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभांचा आढावा घेणे आणि बदल सुचवणे हे त्याचे कार्य आहे.

7 व्या वेतन आयोगावेळी जो फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांची वेतन वाढ करण्यात आली होती. त्याच आधारावर 8 व्या वेतन आयोगतंर्गत पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला. तेव्हा कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7000 रुपयांहून थेट 18,000 रुपये इतके झाले होते. याचप्रमाणे 8 व्या वेतन आयोगात 7 व्या वेतन आयोगप्रमाणे किमान वेतन वाढ 18,000 रुपयांहून थेट 51,480 रुपये होण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युलात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा ठरेल. याशिवाय डीए पण अंतर्भूत होईल. त्यावरून 8 व्या वेतन आयोगातंर्गत वेतन वाढ दिसून येईल.

सामान्यतः, दर १० वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते. सातवा वेतन आयोग फेब्रुवारी २०१४ मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याच्या शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या. यामुळे सरकारवर वार्षिक जवळपास 1.02 लाख कोटींचा (GDP च्या 0.65%) अतिरिक्त बोजा पडला होता. आता ८ व्या वेतन आयोगातंर्गत अजून मोठा बोजा पडण्याची शक्यता आहे.
पगाराचे गणित काय?
8 व्या वेतन आयोगातंर्गत किती पगार वाढ होईल हे फिटमेंट फॅक्टर आणि डीएवर आधारीत आहे. सातव्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. 8 व्या वेतन आयोगातंर्गत तो 2.86 इतका वाढेल. तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर डीए शुन्य होतो. सातव्या वेतन आयोगातंर्गत डीए 58 टक्के इतका आहे.
7 व्या वेतन आयोगातंर्गत पगाराचे गणित काय?
बेसिक पे, मुळ पगार – 25,000 रुपये
DA 58% – 14,500 रुपये
HRA(Metro,27%)- 6,750 रुपये
एकूण वेतन – 46,250 रुपये
8 व्या वेतन आयोगातंर्गत वेतन
मुळ वेतन (अंदाजित) 25,000*2.86(फिटमेंट फॅक्टर)= 71,500 रुपये
DA=0
HRA (मेट्रो सिटी,27%) – 19,3035 रुपये
एकूण वेतन = 71,500 + 19,305 = 90,805 रुपये
या आधारावर बेसिक पेन्शन 9,000 रुपये आहे. 8 व्या वेतन आयोगातंर्गत ही रक्कम 25,740 रुपये होईल.



