⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | नोकरी संधी | युनियन बँकेत पदवीधरांना काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 500 जागांवर पदभरती

युनियन बँकेत पदवीधरांना काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 500 जागांवर पदभरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही देखील पदवीधर असाल व बँकेच्या परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी. युनियन बँक ऑफ इंडियाने भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही भरती शिकाऊ म्हणजेच अप्रेंटिस पदासाठी होत आहे. Union Bank of India Bharti 2024

या भरती प्रक्रियेतून 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी कोणत्याही राज्यातील उमेदवारांना अर्ज करता येणार असून अर्ज करताना उमेदवारांना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ते केवळ त्यांच्या राज्यात नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार असतील ते 28 ऑगस्ट पासून अर्ज करू शकतात व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 पर्यंत असून उमेदवारांना unionbankofindia.co.in ह्या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. Union Bank of India Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादेची अट?
या भरती करिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांचे वय हे 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे व वयाची गणना ही एक ऑगस्ट 2024 पासून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये प्रवर्गनिहाय कमाल वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. जसे की ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयात तीन वर्षे व एससी आणि एसटी कॅटेगिरी येथील उमेदवारांना वयात पाच वर्ष अपंग प्रवर्गातील उमेदवारांना दहा वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

निवड कशी केली जाईल?
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्याकरिता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे व ही शंभर गुणांची परिक्षा असणार असून या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा सीटीबी मोडमध्ये असणार असून यासाठी 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना मेडिकल साठी बोलावले जाईल व अंतिम निवड ही मेरिट लिस्ट म्हणजेच गुणवत्तेद्वारे केली जाईल. या भरतीविषयी अधिक माहिती हवी असेल तर बँकेकडून जारी करण्यात आलेली जाहिरात पाहणे गरजेचे आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.