अज्ञात चोरट्यांनी रेल्वे ट्रॅकमनची पिशवी लांबविली ; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । मोहाडी शिवारात रेल्वे ट्रॅकमनची पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती श्याम नेत्राम परदेशी (वय-५६) यांनी दिली आहे. परदेशी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, श्याम नेत्राम परदेशी (वय-५६) रा. हरीविठ्ठल नगर जळगाव हे रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी त्यांची ड्यटी मोहाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर होती. सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास ते मोहाडी शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ४१२/८ जवळून जात असंतना त्यांनी त्यांच्याजवळील रेल्वेच्या मालकीची पिशवी मोकळ्या जागी ठेवून जवळील शेतात पाणी पिण्यासाठी गेले. तर अज्ञात चोरट्यांनी त्यांची पिशवी चोरून नेली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी रात्री १० वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.