⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

अज्ञात चोरट्यांनी बोअरिंगचे साहित्य केले लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील बोराळे शिवारातील शेतातून बोअर करण्याचे २० हजार रूपयांचे किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाला.

धनराज भागवत तायडे (रा.अट्रावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गावातील सुपडू कोळी यांचा भागीदारीत विहिरीमध्ये आडवे बोर लावण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. मशिन तसेच बोरींगचे साहित्य घेऊन ते बोराळे शिवारातील बलराजसिंग राजपूत यांच्या शेतात कामानिमित्त ठेवले होते. शनिवारी सकाळी या साहित्यांपैकी काही सामानाची चोरी झाल्याचे समोर आले. त्यात इलेक्ट्रिक मोटार, पाइप मिळून सर्व साहित्याची किंमत सुमारे २० हजार रूपये होती.