जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । महिलांसह मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने केलेल्या अत्याचारातून एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याबाबत पाचोरा पोलाीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेमकी काय आहे घटना?
पाचोरा शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या तरुणाने पीडित मुलीवर तीन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिलीचा धक्कादायक घटना समोर आली.
त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.