⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ ।  जळगाव तालुक्यातील मुमराबाद येथील कार्यकर्ते उमेश दत्तात्रय पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते आज मुंबईतील प्रदेश कार्यालयातील एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत पाटील, जळगाव कृ.ऊ.बा. समितीचे संचालक अरुण पाटील यांचेसह संदीप बेडसे, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाचे युवा संघटन मजबूत करणे, जिल्ह्यात पक्षाची बुथ यंत्रणा मजबूत करणे, गांव तिथे शाखा हा मानस असल्याचे नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले. आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो हेच माझ्या नेमणुकीतून सिद्ध होते असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ.सतीशअण्णा पाटील, रोहिणीताई खडसे यांचेसह सर्व मान्यवर नेत्यांचे मी आभार मानतो.

उमेश पाटील सन २००८ पासून पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये तालुका तसेच जिल्हास्तरावर सरचिटणीस, उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते ममुराबाद येथील खंडेराव देवस्थानाचे विश्वस्त असून त्यांनी गावात वाचन चळवळीस चालना मिळावी म्हणून श्री मनुदेवी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय सुरु केलेले आहे. ममुराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे देखील ते अध्यक्ष आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.