---Advertisement---
जळगाव जिल्हा

भुसावळ मार्गे धावणार उधना-मालदा टाऊन नवीन एक्स्प्रेस ; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविल्या जात असून यातच पश्चिम रेल्वेने उधना-मालदा टाऊन दरम्यान दोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

train 1

या दोन्ही रेल्वेंचे वेळापत्रक जाहीर केले असून, ही रेल्वे भुसावळ मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक ०३४१८ उधना-मालदा टाऊन उन्हाळी विशेष रेल्वे १४ एप्रिल रोजी धावणार आहे. तर गाडी क्रमांक ०३४१७ मालदा टाउन-उधना उन्हाळी विशेष रेल्वे ही १२ एप्रिल रोजी धावणार आहे.

---Advertisement---

या स्थानकांवर थांबा?
या दोन्ही रेल्वेंना चालठाणा, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, उपाध्याय, बक्सर, आरा, पटना या स्थानकांवर थांबा आहे

नाशिक ते बडनेरा या गाड्यांना ३० पर्यंत मुदतवाढ
दरम्यान रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढचा निर्णय घेतलाय. गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक तसेच गाडी क्र. ०१२१२ नाशिक ते बडनेरा या गाड्यांना ३० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
असे आहे नवीन वेळापत्रक
बडनेरा (सकाळी १०.०५ वाजता), मूर्तिजापूर (सकाळी १०.३० वाजता), बोरगाव सकाळी १०.४८ वाजता, अकोला सकाळी ११.०२ वाजता, शेगाव सकाळी ११.३३ वाजता, नांदुरा (दुपारी १२.०३ वाजता), मलकापूर (दुपारी १२.३८ वाजता), बोदवड (दुपारी १.३७वाजता), भुसावळ (दुपारी ३.० > वाजता), जळगाव (दुपारी ३.३५ वाजता), पाचोरा (दुपारी ४.०५ वाजता), चाळीसगाव (दुपारी ४.३८ वाजता), नांदगाव (दुपारी ५.२० वाजता), मनमाड (दुपारी ५.५० वाजता), लासलगाव (संध्याकाळी ६.०५ वाजता), निफाड (६.२५ वाजता), नाशिक (रात्री ७.५ वा.)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment