---Advertisement---
जळगाव जिल्हा

आनंदाची बातमी! जळगावमार्गे धावणार उधना-गया विशेष ट्रेन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांमुळे गाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्ष्यात आणखी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पश्चिम रेल्वेकडून उधना-गया-उधना दरम्यान दोन साप्ताहिक रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही रेल्वेंना जळगावात थांबा दिला आहे.

train

गाडी क्रमांक ०९०३९/०९०४० उधना-गया साप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०९०३९ उधना-गया स्पेशल दर शुक्रवारी उधना येथून २२.०० वाजता निघेल आणि रविवारी ०३.१५ वाजता गया येथे पोहोचेल. ही ट्रेन २३ मे ते २७ जून २०२५ पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. ०९०४० गया-उधना विशेष गाडी दर रविवारी सकाळी ७.१० वाजता गयाहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता उधना येथे पोहोचेल. ही ट्रेन २५ मे ते २९ जून २०२५ पर्यंत धावेल.

---Advertisement---

या स्थानकांवर असेल थांबा?
ही ट्रेन चारठाणा, बारडोली, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय, सासाराम आणि देहरी ऑनसन स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment