जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । भुसावळ जळगाव मार्गे सुरतला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे उधना – पाळधी ही मेमू रेल्वेगाडी आता भुसावळपर्यंत धावणार आहे. या गाडीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे- पाटील यांनी दोंडाईचा स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
अशी आहे वेळ?
उधना – भुसावळ (१९१०५) ही मेमू ट्रेन उधना स्थानकातून येथून १२.४५ ला सुटेल. व्याराला १३.५५, नवापूर १५.०१, नंदुरबार १६.४५, दोंडाईचा १७.४०, सिंदखेडा १८.०४, अमळनेर १९.०६, धरणगाव, १९.३७, पाळधी २०.२०, जळगाव २१.०५ आणि भुसावळ स्थानकात ९.५० ला पोहचेल.
भुसावळ -उधना (१९१०६) मेमू ट्रेन भुसावळ स्थानकातून रात्री २२.१५ ला सुटेल. त्यांनतर भादली २२.२७, जळगाव २२.४०, धरणगाव २३.३३, अमळनेर १२.२४, नरडाणा रात्री १ वाजेल, शिंदखेडा १.१७, दोंडाईचा १.४२, नंदुरबार २.२८, नवापूर ४.३०, व्यारा ५.२७, बारडोली ०६.०८ आणि उधना स्थानकात सकाळी ६.३० ला पोहचेल.
या स्थानकांवर थांबेल
ही रेल्वेगाडी भुसावळ येथून सुटल्यावर भादली, जळगाव, पाळधी, चावलखेडे, धरणगाव, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होल, सिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाला, टीसी, चौपाले, नंदुरबार, ढेकवड, खांडबारा, खाटगाव, चिंचपाडा, कोलडे, नवापूर, भाडभुंजा, लक्कड कोट, उकाई सोनगड, किकाकुई रोड, व्यारा, मढी, बारडोली, गंगाधरा, चलथान या स्थानकावर थांबणार असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.