---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

भाजपवाल्यांनो, सावधान! उद्या हे स्वत:ला नरेंद्र मोदी समजतील अन्… उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे गट भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केलं आहे. यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात असल्याने हा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde

udhav thakre eknath shinde jpg webp

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

---Advertisement---

ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असं ठाकरे म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---