जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । अमळनेर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करत चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. गजानन दिलीप ताकतोडे (रा. गांधलीपुरा, अमळनेर), विक्की जवाहरलाल सोनवणे (रा. सानेनगर, तांबेपुरा), संभाजी बाळू पाटील (रा सातरणे) यांची नावे समोर आली.
याबाबत असे की, रामनगर भागातील रहिवासी दिनेश चौधरी यांची सुजाण मंगल कार्यालयाजवळील पार्किंगमधून एचएफ डीलक्स दुचाकी (क्र.एम.एच.१८-ए.डी.४ ७१५) १३ रोजी रात्री चोरट्याने लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करत होते. तांबेपुरा भागातील भूषण पाटील हा त्याच्या साथीदारांसह दुचाकी चोरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार तपास पथकातील सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत, सहाय्यक फौजदार बापू साळुंखे, सुनील हाटकर, मिलिंद भामरे, दीपक माळी यांनी संशयित भूषणला ताब्यात घेऊन चौकशी केली. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन १० दुचाकी जप्त केल्या.
जप्त केलेल्या दुचाकी अशा…
हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स (क्र.एम.एच.१८-ए.व्ही .४७१५), बजाज डिस्कव्हर, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, पॅशन एक्सप्रो, हिरो होंडा सी.बी.झेड., एच.एफ.डिलक्स काळ्या रंगाची, दोन होंडा शाईन काळ्या रंगाच्या, हिरो कंपनीचे इंजीन असलेली अशा १० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. एकूण २ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हे देखील वाचा :
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?
- भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..
- दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध
- मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने चाळीसगाव हादरले; संशियत CCTV कॅमेऱ्यात कैद..