जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । कारने दिलेल्या धडकेत मोठा वाघोदा (ता.रावेर) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सावदा-फैजपूर मार्गावरील जे.के.स्टीलजवळ शनिवारी सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली. रशीद अहमद तडवी (वय ३६) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, मोठे वाघोदा येथील रहिवासी रशीद तडवी हा केळी कामगार होता. तो जेवणाचा डबा घेण्यासाठी दुचाकीने (क्रमांक एमएच.१९-बीजे.४३७८) फैजपूरकडे जात होता. यावेळी सावद्याकडून येणाऱ्या कारने (एमएच.१९-एजी.६७६९) समोरून येत धडक दिली. त्यात दुचाकीस्वार रशीद तडवी हा गंभीर जखमी होऊन मृत झाला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
तडवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अपघातात ठार झालेला तरूण हा कुटुंबातील कमावती व्यक्ती होती.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?