⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | Jalgaon : चोरीच्या तीन दुचाकीसह दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon : चोरीच्या तीन दुचाकीसह दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. एकंदरीत चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिलेला नाहीय. यामुळे जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच जळगाव तालुक्यातील उमाळा येथून दुचाकी दोन चोरट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण ३ दुचाकी जप्त करण्यात आला आहे. अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता असून याबाबत चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी भूषण झांबरे १९ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने (एमएच १९ बीएल ९३३४) या दुचाकीवरून जळगावकडे येत असताना रस्त्यावरील उमाळा बसस्थानकाजवळ नास्ता करण्यासाठी थांबले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटात हे त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कुसुंबा शिवारातील काही मुलांनी उमाळा गाव परिसरात अजून काही दोन दुचाकी चोरून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली.

या गुन्ह्याच्या शोध घ्यावा, अशा सूचना पोलीस निरीक्षक निकम यांनी दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय-२२ आणि निखिल जयराम पाटील वय-२१ दोन्ही रा. इंदिरानगर, कुसुंबा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.