जळगाव जिल्हा
आजपासून दोन दिवस जळगाव-पुणे विमानसेवा ; असे आहेत वेळापत्रक..
जळगाव लाईव्ह न्यूज | 18 मे 2024 | जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महिनाभरापूर्वी हैदराबाद, गोवा येथील विमानसेवा सुरू झाल्यानंतर फ्लाय ९१ विमान कंपनीने जळगावकरांच्या मागणीनुसार पुणे विमानसेवाही सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. त्यानुसार आज दि. २४ व २६ मे रोजी प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू केली – जाणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही सेवा नियमित केली जाणार आहे.
असे आहेत वेळापत्रक
गोव्यावरून सकाळी ११.५५ वाजता विमान जळगावकडे उड्डाण करेल. ते दुपारी १:४० वाजता जळगावला पोहोचेल, जळगाववरून दुपारी २:१० वाजता पुण्याकडे हे विमान जाईल. पुण्याला ३:२५ वाजता हे विमान पोहोचेल, तर पुण्यावरून ३:५५ वाजता जळगावकडे उड्डाण करेल. सायंकाळी ५:२० वाजता पोहोचेल. तर ५:४० वाजता हे विमान गोव्याकडे उड्डाण करणार आहे