जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील पाचोरा रोडवरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानंतर क्षणातच दोन्ही वाहनांनी पेट घेत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. अपघातानंतर दोन्ही कारमधील तरुण बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिक धावून आले. दोन्ही कार एकमेकांच्या विरुद्ध बाजूने येत असताना त्यांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. वाहनांमधून धूर आणि ज्वाला उसळताना दिसत होत्या.

या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत अपघातानंतर तातडीने दोन्ही कारमधील तरुण बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती असून काही जण किरकोळ जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. एका कारच्या एयर बॅग उघडल्यांमुळे त्यातील तरुण बचावाला असून त्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे








