जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । धरणगाव शिवारातील चोरगाव परिसरात मादी बिबट्या आणि दोन बछड्यांचा मुक्त संचार आहे. मादी बछड्यांना शिकारीचे प्रशिक्षण देत फिरत असल्याचा अंदाज असून पुन्हा दोन वासरांचा फडशा पाडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला आहे.

चोरगाव परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. चार दिवसापूर्वी दोन वासरूंचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरल्याने वनविभागाने शोधमोहीम सुरू केली होती. तसेच रात्रीच्या वेळी आणि अंधारात वावरताना बॅटरी घेऊन फिरण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
शुक्रवारी सकाळी विजय सुपडू सोनवणे हे पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास शेतात म्हशींचे दूध काढण्यासाठी गेले होते. ५.३० ला ते घरी परतले आणि पुन्हा ६.३० ला ते शेतात परतले असता दोन वासरूंचा फडशा पाडलेला असल्याचे दिसून आले.
कोंढार शिवारातील शेतात सकाळी ७.३० च्या सुमारास हिरा सोनवणे हे शेतात जात असताना एक बिबट्या मादी आणि दोन बछडे मुक्त संचार करताना दिसून आले. बिबट्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हे देखील वाचा :
- Erandol : मासे पकडल्यानंतर घरी परतत काळाचा घाला ; अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
- 3 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी लागू
- बिअरप्रेमींसाठी गुडन्यूज ! 200 रुपयांची बिअर फक्त 50 रुपयांत मिळणार? बातमी एकदा वाचाच..
- आनंदाची बातमी! जळगावमार्गे धावणार उधना-गया विशेष ट्रेन
- बस स्थानकात पर्स लांबवणाऱ्या ६ महिला जेरबंद