जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथून जवळच असलेल्या मोहरद येथे गावाला विज पुरवठा करणाऱ्या डिपीतुन जमिनीत विज प्रवाह उतरून शाॅक लागून दोन म्हशींचा मृत्यू झाला. तर म्हशी घेऊन जाणारा तरून थोडक्यात बचावला तर घटना घटनास्थळी आलेला कंत्राटी वायरमन यालाही विजेचा धक्का लागला मात्र तो दुर झाल्याने तोही बचावल्याची धक्कादायक घटना सकाळी साडेआठ वाजता घडली.
याबाबत सविस्तर असे की मोहरद येथे गावाला सिंगल फेज विजपुरवठा करण्याठी दोन डिप्या आहेत.त्यापैकी गावहाळ जवळ असलेल्या १नंबर डिपीवर आर्थिंगची वायर तुटून डीपीच्या जवळपास १० ते १५ फुटाच्या परिसरातील जमिनीत विजेचा प्रवाह उतरला होता.याच वेळी हसीना गुलशेर तडवी या शेतमजूरी करणाऱ्या महिलेच्या दोन म्हशी त्यांचा मुलगा रसूल गुलशेर तडवी हा घेऊन हाळकुंडाजवळ पाणी पाजण्यासाठी आला असता अचानक म्हशी डीपीच्या दिशेने ओढल्या गेल्या व जोरदार विजेचा झटका लागून मृत झाल्या.
हैशी हाकणारा तरून व वायरमन बवाचला
डोळ्या समोर आपल्या म्हशी डिपीकडे ओढल्या जाऊन तरफडत असतांना त्यांना हाकलून नेनारा तरून रसूल तडवी याने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का लागून तो बाजूला फेकला गेला.व सुदैवाने तो वाचला सदरील घटना गावातीलच कंत्राटी वायरमन सलीम तडवी याला माहीत होताच तोही घटनास्थळी येवून डिपी बंद करण्यासाठी जात असतांना त्यालाही विजेचा धक्का लागला.तो वेळीस समयसुचकता दाखवत बाजूला झाल्याने मोठी दुदैवी घटना टळून म्हैस हाकणारा तरून व वायरमन बचावले.
गेल्या वर्षीही गेला होता १२ वर्षीय बाळाचा जिव
धानोरा विज मंडळाचा च्या भोंगळ कारभाराने गेल्या वर्षी येथील जि.प.शाळेजवळ असलेल्या लोखंडी खंब्यात विज प्रवाह उतरून जवळच खेळणाऱ्या एका सहावीत शिकणारा बारा वर्षीय बाळाचा जिव घेतल्या ची दुदैवी घटना घडली होती.तरीही येथील विधिमंडळाच्या कारभारात काहीही फरक पडलेला दिसत नाही.आताही आठ दिवसांपासून सदर डिपीवर आग लागून विज प्रवाह उतरत असल्याची माहीती ग्रा.पं.चे शिपाई सत्तार तडवी यांनी दिली होती. अशी माहीती त्यांनी घटनास्थळी प्रत्येक्ष भेट दिली असतामाहीती दिली.त्यामुळे आणखी कोणाचा जिव चाण्याचीच प्रतीक्षा धानोरा विज वितरण कार्यालत करत होते की काय? असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.सदरील घटनेची अडावद पोलीस स्टेशनला हसीदा तडवी यांच्या तक्रारीवरून नोंद झाली असून स.पो.उप निरिक्षक जगदीश कोळंबे यानी पंचनामा केला आहे.त्यात ८० हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.
मदतीसाठी प्रस्ताव पाठवणार
सदरील घटनास्थळाला भेट देऊन माहीती घेतली असता डीपीवरील आर्थिगची वायर तूटून घटना घडली आहे. याबाबत पशूधन मालकाला मदतीसाठी माझ्या कडील सर्व बाबी पुर्ण करून प्रस्ताव वरिष्ठांना लवकरच पाठवणार आहे.
डी.डी.घरजारे
स.अभियंता विज वितरण कार्यालय धानोरा