---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

पाळधी बायपासजवळ दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या ; चार जण जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । महामार्ग सहावर होणाऱ्या अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगावपासून काही अंतरावर असलेल्या पाळधी बायपासजवळ दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातामधील जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

या घटनेबाबत असे की, पाळधी बायपास जवळ आज २२ एप्रिल रोजी दुपारी दोन दुचाकीचा अपघात झाला. ज्यात जळगाव पिंप्राळा भागातील रहिवाशी असलेले बापुराव महादु पाटील वय ५६ हे आपल्या पत्नीसोबत संगिता बाबुराव पाटील वय ४२ यांच्या सोबत दुचाकीने जळगावकडे येत होते. त्यावेळी समोरून येणारी दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

---Advertisement---

या भीषण अपघातात बापुराव पाटील व त्यांची पत्नी संगिता पाटील हे जखमी झाले तर समोरील दुचाकीवरील मगन पुन्या बारेला (वय २५) आणि उपरसिंग बरडे बारेला (वय २२ दोन्ही रा. मध्यप्रदेश) हे दखील जखमी झाले. यातील मगन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment