अमळनेर-धरणगाव मार्गावर भीषण अपघात ! भरधाव बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जागीच ठार

फेब्रुवारी 12, 2026 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर ते धरणगाव रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात अमळनेरजवळील बुलढाणा अर्बनच्या गोडाऊनसमोर घडला.

accident jpg webp

या प्रकरणी अमोल राजू चव्हाण (रा. हनुमान नगर, पारोळा नाका, धरणगाव) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून त्यांचे भाऊ नरेंद्र राजू चव्हाण (वय 39) हे आपल्या एमएच 19 डीबी 6679 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून धरणगावकडून येत होते. त्यांच्या सोबत नातेवाईक विश्वास रोहिदास सोनवणे (वय 42, रा. भाडणे, ता. साक्री) हे देखील दुचाकीवर बसलेले होते.

Advertisements

दरम्यान, अमळनेर-धरणगाव रोडवरील बुलढाणा अर्बन गोडाऊनजवळ समोरून येणाऱ्या एमएच 39 एडी 3119 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नरेंद्र चव्हाण आणि विश्वास सोनवणे यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर बोलेरो पिकअपचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी अमोल चव्हाण यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार नामदेव बोरकर पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now