2000 रुपयांची लाच घेताना भुसावळचे दोघे पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पोलीस दलात खळबळ

ऑगस्ट 22, 2025 3:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेच्या घटना वाढतं असल्याचं दिसून येत असून आठवड्यात एक दोन तरी लाचखोरीची घटना समोर येत आहे. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

lach jpg webp

काय आहे प्रकार?

एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले होते. हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

Advertisements

एसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई भुसावळ शहरातील मामा बियाणी शाळा परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisements

दरम्यान दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now