बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करताना दोघांना पकडले.. २५ मांजाचे रीळ जप्त

जानेवारी 10, 2026 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात पर्यावरणास घातक आणि बंदी असलेल्या नायलॉन मांजाची चोरटी विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी घडक मोहीम हाती घेतली असून अशातच शनिपेठ पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या २ तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० हजारांचे २५ मांजाचे रीळ जप्त केले आहे.

manja

पक्षी आणि मानवाच्या सुरक्षिततेसाठी शासनाने नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही जळगावमध्ये चोरीछुपे नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी घडक मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत शहरात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Advertisements

यातच दोन तरुणांना नायलॉन मांजाची विक्री करताना अटक केली. शनिपेठ व रिघूरवाड्यात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती शनिपेठ ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाक यांनी मिळाली होती. यांनतर उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या पथकाने वाजता दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. ओक मंगल कार्यालयामागे राहणारा रितांशू नरेंद्र चौधरी (वय १९) याला १२ हजारांच्या १५ नायलॉन मांजाच्या रीळसह ताब्यात घेण्यात आले.

Advertisements

रिघूरवाडा येथील आलोक ज्ञानेश्वर भोसले (वय २०) याच्याकडून ८ हजारांचे १० नायलॉन मांजाचे रीळ जप्त करण्यात आले. या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम २२३ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६च्या कलम ५ व १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई निरीक्षक कावेरी कमलाकर, पीएसआय योगेश ढिकले, संतोष खेडकर यांच्या पथकाने केली.

माहिती द्या, नाव गुप्त राहणार ?
आपल्या परिसरात नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करत असल्याचे आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा टोल फ्री क्रमांक ११२वर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिस दलाने कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now