एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर डल्ला मारणारे चोर पोलिसांच्या जाळ्यात ; त्या सीडी व पेन ड्राईव्ह काय झालं?

नोव्हेंबर 3, 2025 4:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२५ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणात दोन जणांना अटक केली. तसेच चोरलेले मौल्यवान दागिने देखील पोलिसांना सापडले आहेत. दोघांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

khadsehome chori

एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरात असलेल्या मुक्ताई बंगल्यावर चोरी झाली होती. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी खडसेंच्या बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Advertisements

मात्र प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

Advertisements

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरातून कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाली असल्याचा दावा केला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह आढळलेला नाही. तसेच एकनाथ खडसे यांनी एफआयआर मध्ये तसेच पुरवणी जबाबात कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचे म्हटले नसल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now