⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | Jamner : दीड हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीच्या टेक्नीशीयनसह खासगी पंटर जाळ्यात

Jamner : दीड हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीच्या टेक्नीशीयनसह खासगी पंटर जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२३ । जनजागृती करूनही सरकारी खात्यामध्ये लाचखोरीचे प्रमाण काही कमी होत नाहीय. जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी कारवाई होतच आहे. अशातच आता जामनेर तालुक्यातून लाचखोरीच्या बातमी समोर आलीय.

फत्तेपूर येथे वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीचा टेक्नीशीयनसह खासगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. विनोद उत्तम पवार (टेक्नीशीयन) आणि कलीम तडवी (खासगी पंटर) या दोघांना लाच घेताना रंगेहात अटक केली असून या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात एकाच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकरण काय?
तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील रहिवाशी असून त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी यांनी दोन हजार रूपये डिमांड नोट भरण्यासाठी घेतले होते. तरी देखील वीज मीटर लावलेले नव्हते.

मात्र आता पुन्हा वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी लाचलुचपत विभागाने आज बुधवारी १९ एप्रिल रोजी दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी तक्रारदारकडून दीड हजाराची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.