गुन्हेजळगाव शहर

तामिळनाडूत ५० लाखांचा डल्ला मारणाऱ्या दोघांना सिनेस्टाईल पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ ।  तामीळनाडू येथील रहिवाशी असलेल्या व्यापाऱ्याकडे कामाला असलेल्या एकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने ५० लाख रूपयांची जबरी चोरी करून रेल्वेने राजस्थानला पळून जाता असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने दोघांना  अटक करण्यात आली आहे. मंगलराम आसुराम बिस्नोई (वय-१९) रा. खडाली ता. गुडामालाणी जि.बडमेर (राजस्थान) असे चोरट्याचे नाव असून त्यात एक अल्पवयीन आहे.  दरम्यान, दोघांना घेण्यासाठी तामिळनाडू पोलीस पथक जळगावकडे रवाना झाले आहे.

याबाबत असे की, तामिळनाडू येथील रहिवासी असलेले मोहनकुमार जगाथागी देवनयागम या व्यापा-याकडे राजस्थानमधील दोघा नोकरदारानी ५० लाखाची जबरी चोरी केल्याची घटना १९ मे रोजी घडली होती. या प्रकरणी तामिळनाडू – सेलम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघे आरोपी राजस्थान येथील असल्याने ते चोरीच्या रकमेसह राजस्थानात जाणार असल्याची माहिती सेलमच्या पोलिस अधिक्षकांना समजली होती. त्यांनी याबाबतची माहिती जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना कळवली होती. त्यानुसार पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपले सहकारी या आरोपींच्या मागावर रवाना केले होते.

संशयित दोन्ही आरोपी हे चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमधून जाण्याची दाट शक्यता असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आज मलकापूर ते जळगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसच तपासणी केली. त्यात संशयित आरोपी मंगलराम आसुराम बिस्नोई (वय-१९) रा. खडाली ता. गुडामालाणी जि.बडमेर (राजस्थान) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ३७ लाख ९७ हजार ७८० रूपये हस्तगत केले आहे. दोन्ही संशयितांचा ताबा घेण्यासाठी तामिळनाडू पोलीस जळगावकडे रवाना झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button