---Advertisement---
धरणगाव गुन्हे

दुर्दैवी ! उकळत्या दुधात पडलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे बहिणीसोबत खेळत असताना अडीच वर्षीय रोहन सुभाष धोबी हा चिमुरडा उकळत्या दुधात पडल्याची घटना १३ ऑक्टोबरला घडली होती. दुर्दैवाने या बालकाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात २४ ऑक्टोबरला मृत्यू झाला.

rohan dhobi 1 jpg webp

याबाबत असे कि, पिंप्री खुर्द येथील बालकाचे आजोबा डेअरीवर कामाला आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी दररोज दोन ते तीन लीटर दूध येते. हे दूध १३ रोजी सकाळी घराबाहेर तापवायला चुलीवर ठेवले होते. या दरम्यान, रोहन धोबी हा  बहिणीसोबत खेळत असताना, उकळत्या दुधात पडून ३६ टक्के भाजला होता. त्याला तात्काळ जळगाव येथे हलवले होते.

---Advertisement---

प्राथमिक उपचारानंतर बालकाला पुढील उपचारांसाठी १४ रोजी मुंबईच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे २४ रोजी चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. २५ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. बालकाच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा व मोठी बहीण असा परिवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---