बॅटऱ्या लांबविणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; 10 बॅटऱ्या जप्त

जून 24, 2025 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव शहरातील समीर स्कूल ग्रीनपार्क परिसरासह अन्य भागांतून वाहनांच्या बॅटऱ्या लांबविणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 63 हजार रुपये किमतीच्या 10 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

batery

21 जून रोजी रात्री 10 वाजल्यापासून 22 जूनच्या सकाळपर्यंत भडगाव शहरातील विविध भागातून 9 वाहनांमधील सुमारे 53 हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी नासीर खान रशीद खान हा वाहनचालक असून (रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) त्याने भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisements

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि माहितीच्या आधारे आरोपींच्या तपासात दोन संशयितांचे नावे समोर आली. यामध्ये समीर शेख कदीर शेख आणि शायेब सय्यद मुनव्वर (दोघे रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) या दोघांनीच बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. अटकेनंतर संशयितांनी चोरी केलेल्या बॅटऱ्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप चौधरी यांनी ही कारवाई पार पाडली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment