⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | तूर ठेवायची की विकायची? भाव घसरला, जळगाव जिल्ह्यात कुठे किती दर मिळतोय?

तूर ठेवायची की विकायची? भाव घसरला, जळगाव जिल्ह्यात कुठे किती दर मिळतोय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकरी हतबल आहे. त्यातच आता तुरीलाही भाव नाहीय. बाजारात सध्या नवी तूर विक्रीसाठी येत असून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तुलनेत दर कमालीचे घसरले आहेत. क्विंटलमागे एक ते दीड हजारांनी भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. त्यामुळे तूर घरात ठेवायची की विकायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तुरीच्या दरात घसरण होण्याची कारणे तूर बाजारात विक्रीला येऊ लागताच दरात घसरण वाढली.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीन, कपाशीसह तुरीला बसला. पावसाच्या उघडीपमुळे पिकांची वाढ खुंटली. त्यातच ऐन भरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले. तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना रावेर व अन्य भागात गारपिटीचा फटका बसला, त्यामुळे तुरीचे नुकसान झाले. यातून पीक सावरते न सावरते तोच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला. यातून सावरलेले पीक सध्या बाजारात आले आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतीत झाला असून तूर विकावी की ठेवावी या संभ्रमात आहे. शासनाने तुरीला ७५५० रुपये प्रति क्विंटल हभीभाव जाहीर केला असला, तरी शासनाच्याच बाजार समित्यांमध्ये तुरीला ६४०० ते ६८०० रुपये असा भाव मिळत आहे.

दरम्यान तुरीचे भाव काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी झाल्याने हे भाव वाढतील. जळगाव बाजार समितीत अजून फार आवक नाही. बाजारात तुरीची आवक सुरू आहे. परंतु, गतवर्षीपेक्षा आवक कमी आहे. दरांमध्ये चढ-उतार आहेत.

जिल्ह्यात कुठे किती दर मिळतोय?
जळगाव – ६४००
अमळनेर – ६५००
चाळीसगाव – ५०००
पाचोरा – ६९९१

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.