⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी अनुभवली राष्ट्रपतीची संस्मरणीय भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना केद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युबयो ) योजनेतुन शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा या करीता टॅलेट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावल व दैनिक पुढारी यांच्यावतीने दिल्ली दर्शन व महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रत्यक्ष भेट घडवुन देण्यात आली.

यामध्ये यावल प्रकल्पात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वैजापूर येथील सोनिया बारेला, शासकीय आश्रम शाळा लालमाती शाळेतील शितल बारेला, शासकीय आश्रम शाळा गंगापुरी शाळेतील सुरेश बारेला, शासकीय आश्रम शाळा सार्वेतील श्याम पावरा तसेच विद्यार्थ्यांसमवेत पालक अधिकारी म्हणून वैजापूरच्या अधिक्षिका कुमारी श्वेंता टेंभुर्णी गेल्या होत्या.

सर्व विद्यार्थ्यांनी आग्रा येथे ताजमहाल दर्शन व दिल्ली गेट, कुतुबमिनार, लाल किल्ला, मा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली यांची भेट व राजघाट येथिल महात्मा गांधी म्युझियम, राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालय इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. राष्ट्रपती भावनात जाऊन महामहीम मा. राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत माहामहीम मा. राष्टपतीशी चर्चा केली.

सदर दौरा हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय राहील अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार यांनी व्यक्त केली व दरवर्षी अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून अशा भेटींची संधी प्रत्येकाने मिळवावी यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा या करीता शुभेच्छा दिल्या. या टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील प्रशांत माहुरे , राजेंद्र लवणे, पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल तसेच व्ही. डी गायकवाड, एम.डी पाईकराव, श्रीमती सुलताने मॅडम, एल एम पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यावल व विकास पाटील व कृष्णा पाटील व कार्यालयातील इतर कर्मचारी व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी योगदान दिले.