जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । यावल तालुक्यातील सावखेडा-सिम जवळील नागादेवी आदिवासी पाड्यावरील १५ वर्षीय मुलाने वनक्षेत्रात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली.
नागादेवी आदिवासी पाड्यावरील रहिवासी बन्सीलाल खुमान पावरा (वय १५) गुरे चराई करायचा. तो शुक्रवारी वनक्षेत्रात गुरे चराईसाठी गेला होता. मात्र, परत न आल्याने कुटुंबीयांना त्याचा शोध घेतला. तो शनिवारी एका झाडाला वायरच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यावलचे सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर डॉ. गौरव भोईटे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.