जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । सोशल मिडियात सध्या पुष्पा चित्रपटाच्या गाण्यांची धमाल सुरु आहे. विशेषतः फेसबूक, इन्स्टाग्राम आणि युट्युबला ते गाणे अधिक झळकत आहे. श्रीवल्ली गाण्याचे हिंदी, मराठी व्हर्जन आल्यानंतर खास आपल्या खान्देशी अहिराणी भाषेतील गाणे नुकतेच युट्युबला प्रसारित झाले आहे. अवघ्या दोन दिवसात गाण्याने हजारो व्हिवर्सचा टप्पा ओलांडला असून आपल्या अहिराणीतील गाणे अनेकांच्या काळजाला भिडत आहे.
धरणगाव येथील डीजे गोलू हे गाण्याचे निर्माते असून त्यांच्या कल्पकतेतून ते साकारण्यात आले आहे. अहिराणी श्रीवल्लीचे गीतकार लखन हिरे हे असून तेच गाण्याचे सहनिर्माते देखील आहेत. गोविंद गायकवाड यांनी गाणे गायले आहे तर संगीत विलास वाघ यांनी दिलेले आहे. धरणगाव येथील राजस रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. मिक्सिंग डी.जे.गोलू धरणगाव यांनी केले आहे. अल्पेश कुमावत हे डिजीटल पार्टनर आहेत. ३ मिनिटे २४ सेकंदांच्या या व्हिडीओच्या सुरुवातीला दाखविला जाणारा प्रोमोच जबरदस्त असल्याने गाणे दमदार असणारच यात शंका नाही.
जळगाव जिल्ह्यातील कलावंत गेल्या महिन्यांपासून अहिराणी गाण्यांची सोशल मीडियात चांगलीच धूम आहे. अनेक गाण्यांनी तर करोडो व्हिवर्सचा टप्पा गाठला आहे. डी.जे.गोलू धरणगाव प्रोडक्शनचे ९० हजार सबस्क्राईब आहे. यापूर्वी त्यांचे खान्देशी सांबळ आणि हाई मोबाईलवाली साली रिमिक्स हे गाणे यापूर्वी सुपरहिट ठरले आहेत. भविष्यात देखील अहिराणी गाण्यांना वाव देण्याचा त्यांचा मानस आहे.
अहिराणी श्रीवल्ली गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
हे देखील वाचा :
- समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून
- मानव अधिकार दिनानिमित्त तरसोद येथे जनजागृती रॅली
- डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट
- जळगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त..
- राज्य सरकारकडून 2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर