जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मधील कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वृक्षारोपण मोहीम राबवली. पर्यावरणाचे संरक्षण, हरित परिसराची जपणूक, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा उददेश डोळयासमोर ठेवून प्राचार्य डॉ. जयवंत नगूलकर यांनी पर्यावरणाचे आरोग्य आणि व्यक्तीचे आरोग्य यांचा संबंध स्पष्ट करताना, समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी परिसरात ५० वृक्षाची लागवड करून जतन करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम धेतले.