⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ 9 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील ९ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढले आहे. त्यांना तात्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

यांची झाली बदली
यामध्ये नियंत्रण कक्षातील पोनि सचिन सानप यांची पहुर पो. ठाणे., विशाल जयस्वाल यांची जिल्हापेठ पो. ठाणे, बबन जगताप यांची सायबर पो. ठाणे, सुनिल पवार यांची पारोळा पो. ठाणे, अनिल भवारी यांची जळगाव शहर पो. ठाणे तर जिल्हापेठचे प्रभारी पो. नि. बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ, जिविशा शाखेतील रंगनाथ धारबळे यांची शनिपेठ पो. ठाणे, भुसावळ तालुक्याचे पोनि. विलास शेंडे यांची जिविशा तर वाचक शाखेतील सपोनि रुपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतुक शाखेत बदली करण्यात आली आहे.