⁠ 
शनिवार, जून 15, 2024

जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह झेडपीचे सीईओ यांची बदली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । राज्य शासनाने आज आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची बदली झाली आहे.

सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या आयुष प्रसाद यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गडचिरोली येथील श्री अंकित या आयएएस अधिकार्‍यांची जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या विरोधात अगदी उच्च पातळीपर्यंत तक्रारी केल्या होत्या. यात वाळूसह शस्त्र परवान्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश होता. याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांची बदली झाल्याचे मानले जात आहे. यामुळे तीन वर्षांच्या आधीच त्यांची उचलबांगडी झाल्याचे मानले जात आहे.

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची झाली आहे.