⁠ 
शनिवार, जून 29, 2024

महाराष्ट्रात 420 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; जळगाव जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । महाराष्ट्रातील 420 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंगल यांनी (दि. 25) काढले आहेत. त्यातील 300 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदल्या झाल्या आहेत. तर 120 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात जालिंदर पळे, विशाल जयसिंग टकले आणि संदीप दुनगहू या तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे.

सावद्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांची बदली करण्यात अली. तर विशाल टकले यांची पुणे शहर तर मुक्ताईनगरचे संदीप दुनगहू यांची छत्रपती संभाजी नगर परिमंडळात बदली करण्यात आली. दरम्यान, अधिकार्‍यांनी पदभार सोडल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षकांकडून येथे लवकरच अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येईल.