जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ मार्गे पुण्याहून कोलकात्याकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या एप्रिल महिन्यात रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विलासपूर विभागातील कोटारलिया स्टेशनवर चौथ्या मार्गाचे जोडणी काम सुरू झाल्यामुळे पुणे ते कोलकत्ता दरम्यान धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आले. विशेष या गाड्या भुसावळ मार्गे धावणार आहे. त्यामुळे जळगावच्या रेल्वे प्रवाशांना पुढील महिन्यात काही काळ संकटाचा सामना करावा लागणार आहे.
या कारणांमुळे पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाची या रेल्वे एकूण 13 दिवस बंद राहणार आहे. तसेच पुणे ते हावडा दरम्यान धावणारी दुरांतो एक्सप्रेस सुद्धा 12 एप्रिल, 14 एप्रिल, 19 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. हावडा ते पुणे दरम्यान धावणारी दुरांतो एक्सप्रेस 10 एप्रिल, 12 एप्रिल, 17 एप्रिल आणि 19 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय, पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ही गाडी 11 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर पुणे – संत्रागाची एक्सप्रेस ट्रेन सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल 2025 रोजी रद्द करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा रेल्वे विभागाने दिली आहे.
यामुळे या बदललेल्या वेळापत्रकानुसारच रेल्वे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे नाहीतर त्यांना नाहक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.