⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | वाळूमाफियांची मुजोरी, तलाठीच्या अंगावर घातले ट्रॅक्टर

वाळूमाफियांची मुजोरी, तलाठीच्या अंगावर घातले ट्रॅक्टर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । यावल तालुक्यातील मनवेल येथील थोरगव्हाण मार्गावर विनापरवाना गौण खनिजची वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या तलाठी हे कर्तव्य बजावत असतांना ट्रॅक्टर अंगावरून चालवत पायास दुखापत केल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील मनवेल गाव शिवारातील मनवेल ते थोरगव्हाण मार्गावरील रस्त्यावर सार्वजनिक ठीकाणी आज दिनांक १० मे रोजी सकाळी ८,४० वाजेच्या सुमारास मनवेल येथे तलाठी म्हणुन कार्यरत असलेले स्वप्नील शशीकांत तायडे वय३७ वर्ष हे शासनाच्या आदेशान्वये वाळु वाहतुकदारांना वर कार्यवाहीचे कर्तव्य बजावत असतांना सुभाष सखाराम कोळी, राहणार शिरसाड तालुका यांने त्याच्या ताब्यातील चालवित असलेले स्वराज कंपनीचे मॉडेल क्रमांक७३५हे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर कारवाई करीता थांबविण्याच्या प्रयत्न केले असता सदर ट्रॅक्टर चालकांने वाहन न थांबवता अंगावर आणुन डाव्या पायास दुखापत करून जख्मी केले आणी संशयीत आरोपी हा घटनास्थळावरून ट्रॅक्टर न थांबवता पसार झाला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

दरम्यान स्वप्नील शशीकांत तायडे यांनी यावल पोलीसात सुभाष सखाराम कोळी याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केल्याने भाग५ गु .र . न.८० / २०२१ भादवी कलम ३५३ , ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस अमलदार गौरख गंगाराम पाटील हे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.