---Advertisement---
बातम्या

बांभोरी गिरणा पुलावर ट्रॅक्टरचे एक्सेल तुटले, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । जळगाव शहराकडून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गावरील बांभोरी गिरणा पुलावर सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एका ट्रॅक्टरचा एक्सेल तुटला असून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळची वेळ असल्याने चाकरमान्यांना टॅफीकजामची चांगलीच झळ पोहचली आहे.

traktor fail

जळगाव आणि धुळे शहराला जोडण्यासाठी गिरणा नदीवर एकच पूल असून तो बांभोरीजवळ आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पुलावर एका ट्रॅक्टरचे एक्सेल तुटल्याने तो त्याच ठिकाणी उभा राहिला. ट्रॅक्टरमुळे पूल वाहतुकीसाठी अर्धाच खुला असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होण्यास सुरुवात झाली.

---Advertisement---

काही तासात दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांचे हाल होत आहे. आज सोमवार असल्याने महामार्गावर वाहतूक देखील अधिक होती. दरम्यान, एक्सेल तुटलेला ट्रॅक्टर वाळूचा असल्याचे समजते. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---