जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गांवर अपघाताचा एक थरार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरहुन सिल्लोडकडे येणारा सिमेंटचा ट्रकने ट्रॅक्टरला ओढत स्कुटीसह फरफटत नेले. या घटनेत दोन जण जखमी झाले असून घटनास्थळावरून ट्रक चालक न थांबता भरधाव वेगाने पलायन केला. मात्र काही तरुणांनी पाठलाग केल्याने चालकाने हा ट्रक थांबवला.
याबाबत अधिक माहिती अशी कि,छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गांवरील फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे छत्रपती संभाजीनगरहुन सिल्लोडकडे येणारा सिमेंट घेऊन जाणारा ट्रक क्रं.एम एच १६ ए वाय ५५६६ हा बस स्टॅंडजवळ वर्दळीच्या ठिकाणी भरधाव वेगाने येत असताना त्याच बाजूने चालणाऱ्या ट्रॅक्टरला(नंबर नाही) ओढत स्कुटी (नंबर उपलब्ध झाला नाही)सह फरफटत नेत असतांना त्याच बाजूने स्कुटीवर जाणारा शेख जाकेर शेख जाफर (वय २५ वर्ष)( रा. नायगाव्हाण ता. फुलंब्री) यात गंभीर जखमी झाला
लोकांनी ट्रक चालकास थांबण्याचा इशारा केला तर ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक पळवत सिल्लोडकडे जात असतांना गावातील काही युवकांनी दुचाकीवर पाठलाग करत माणिकनगर येथील सिद्धेश्वर साखर कारखाण्याच्या आवारात ट्रक थांबवला.यादरम्यान या शाळेची इंटरव्हल असल्याने या कारखाना रस्त्यावर शाळेचे ये-जा करत होते. सुदैवाने शाळेचे विद्यार्थी बालबाल वाचले आहे.
सदर ट्रक चालक शेख मोसीन शेख खलिल (वय २७ वर्ष) रा बीड यास ताब्यात घेऊन सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक वडोदबाजार पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आला.या अपघाताची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झिजूर्डे हे करीत आहे.