⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगावसह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या भूजलात विषारी पदार्थ; केंद्राचा धक्कादायक अहवाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२५ । जळगावसह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या भूजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचे धक्कादायक वास्तव केंद्रीय भूजल मंडळाच्या (CGWV) वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालातून उघड झाले आहे. हे उच्च प्रमाण आरोग्यासाठी घातक असल्याचे नमूद केले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५ मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे. मात्र, देशातील एकूण ४४० जिल्ह्यांमध्ये पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या (सीजीडब्ल्यूवी) वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४० मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार अभ्यासलेल्या नमुन्यांपैकी २० टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले.

देशातील १५ जिल्ह्यांमधील भूजलात विषारी पदार्थ अधिक आढळले ते रेड झोनमध्ये आहेत. त्यात महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या ७ जिल्ह्याचा समावेश आहे. ही समस्या न केवळ आरोग्यासाठी धोकादायक आहे तर ती पर्यावरणीय संतुलनासाठी देखील हानिकारक आहे.

किती आहे धोकादायक?
नायट्रेट पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते. ते तोंड आणि आतड्यांमध्ये असलेल्या जीवाणूंमार्फत ऑक्सि डायझर असलेल्या नाय ट्राइटमध्ये रूपांतरित होते. नायट्राइट हिमो- ग्लोबिनमधील आयर्न फैरसला फॅरिकमध्ये बदलते. यामुळे हिमोग्लो बिनचे रुपांतर मेटहिमो ग्लोबिनमध्ये होते. अशा परिस्थितीत हिमोग्लोबिन अर्थात रक्त आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता गमावते.

कारणे काय? भूजलामधील नायट्रेटची वाढती पातळी अत्यधिक सिंचनाचा परिणाम असू शकतो. खतांमधील नायट्रेट जमिनीत खोलवर जाऊन ते पाण्यात मिसळले जाते.
बचावाचे उपाय? : पिण्यासाठी सुरक्षित पर्याय, जसे की बाटलीबंद पाणी वापरा, खासगी बोअरवेल किंवा विहिरीतून पाणी येत असल्यास वर्षातून एकदा पाण्यातील नायट्रेटची तपासणी करा, नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्यास उकळलेले पाणी हा सुरक्षित पर्याय ठरतो, परिसरातील नायट्रेटच्या संभाव्य स्रोतांचा शोध घ्या आणि ते दूर करा.

कोणते आजार होतात?
पोटाचा कर्करोग
लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिद्धोम
जन्मदोष
जन्मजात व्यंग
न्यूरल ट्यूब दोष

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.