जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील इंडियन ऑइल डीलर्सच्या झालेल्या मीटिंगमध्ये पाळधी येथील तोतला ऑटोमोबाईल्सला सर्वाधिक डिझेल विक्री तसेच लुब्रिकंट ऑइल विक्रीमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इंडियन ऑइलचे संभाजीनगर विभागाचे प्रमुख व डी आर एस हेड दीपक कुमार सिन्हा आणि संभाजीनगर येथील रिटेल सेल्स विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक धीरज कुमार यांच्या हस्ते संचालक संजय तोतला व त्यांचे पुत्र अजिंक्य तोतला यांनी या पुरस्कारांचा स्वीकार केला यावेळी सेल्स ऑफिसर सुरजा चव्हाण आणि अक्षय गाडे यांची व जिल्ह्यातील ६० डीलर्सची उपस्थिती होती.