जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । शिवसेनेमध्ये बंड पुकारून महाविकास आघाडीला हादरवून सोडणारे एकनाथ शिंदे हे अनाथांचे नाथ आहेत. असं सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणतात किंवा त्यांना नागरिकांनी अशी उपमा त्यांना दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला हादरा देणारे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० हुन अधिक आमदार असल्याने सर्व देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आहे. मात्र एकनाथ शिंदेंची राजकीय पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. रिक्षाचालक ते मंत्री असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास आहे. एकनाथ शिंदे अनेक वर्षापासून मंत्रिपदावर आहेत. एकनाथ शिंदेंनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे साडे अकरा कोटीची संपत्ती आहे. (Total Wealth Of Eknath Shinde)
एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःच्या 7 गाड्या आहेत. यामध्ये दोन स्कॉर्पिओ, दोन इनोव्हा, एक अर्माडा गाडीचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची किंमत 2019 मध्ये 46 लाख इतकी होती.
एकूण गाड्या किती ?
(Scorpiyo) स्कार्पिओ-2, (Balero)बलेरो – 1, (Enova)इनोव्हा – 2, (Armada)अरमाडा -1, (Tempo)टेम्पो -1 एकूण किंमत – 46 लाख
एकूण सोनं (Gold) किती?
25 लाख 87 हजार किमतीचं सोन त्यांच्याकडे आहे. स्वतःकडे 4 लाख 12 हजाराचं 110 ग्रॅम सोनं तर 580 ग्रॅम सोनं त्यांच्या बायकोकडे आहे. . या सर्व सोन्याचं त्यावेळचं मूल्य 25 लाख 87 हजार इतकं होतं. याच बरोबर तत्यांच्या कडे 1- रिव्हॉल्वहर आणि 1-पिस्तूल देखील आहे.
एकूण गुंतवणूक
(Shivam Transport) शिवम ट्रान्सपोर्टमध्ये तीन लाख गुंतवणूक
(Bombay food packers) बॉम्बे फूड पॅकर्स : आठ लाख
(Shivam enterprises) शिवम एन्टरप्रायजेस ;11 लाख
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. या शेतजमीनचं हे मूल्य 2019 मधलं आहे. सध्या त्यामध्ये वाढ झाल्याचं शक्य आहे. दरे गाव, महाबळेश्वरमध्ये 5 हेक्टर म्हणजेच जवळपास 12 एकर जमीन आहे. चिखलगाव, ठाणे इथे पत्नीच्या नावे – 1.26 हेक्टर जमीन आहे. वागळे इस्टेटमध्ये पत्नीच्या नावे 30 लाखांचा दुकान गाळा.1 खोली – धोत्रे चाळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम : क्षेत्रफळ 360Sq.Ft, 1 फ्लॅट – लँडमार्क को ऑप हौ सोसायटी : क्षेत्रफळ 2370Sq.Ft, पत्नीच्या नवे असणारी संपत्ती 1 फ्लॅट – शिवशक्ती भवन : क्षेत्रफळ 1090Sq.Ft, 1 फ्लॅट – लँडमार्क को ऑप हौ सोसायटी : 2370Sq.Ft, घरं, गाळ्यांचा तत्कालीन बाजारभाव : 9 कोटी 45 लाख एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये आपल्या नावे 3 कोटी 74 लाखाचं कर्ज असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये TJSB चं 2 कोटी 61 लाखांचं गृहकर्ज आहे. याशिवाय श्रीमान रिअॅल्टीचं 98 लाखांच्या कर्जाचाही समावेश आहे.