जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ महिन्यात घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी जाहीर झाला. यंदाचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. दरम्यान, बारावी हे करिअरला कलाटणी देणारे वर्ष असते. बारावीनंतरच पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवतात. आज आम्ही तुम्हाला बारावीनंतर पुढे कोणता करिअर ऑप्शन निवडावा यासाठी काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. चला तर मंग जाणून घेऊयात..

विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी :
जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात, तर तुम्ही पुढे B.Sc पदवीधर होऊ शकता. यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र यांसारखे विषय किंवा यापैकी एक विषय निवडून त्यात पदवीधर होऊ शकता. तसेच पुढील अभ्यासक्रमासाठी तुम्ही एखाद्या नामांकित युनिव्हर्सिटीतून M.Sc देखील करू शकता.
बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आपले भविष्य घडवू शकतात तसेच आयआयटी आणि जेईई परीक्षेची तयारी करू शकतात. जर तुम्हाला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते B.Sc, BA, ग्रॅज्युएशन आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात.
बारावीनंतर कला शाखेतील करिअरच्या संधी :
खरंतर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बरेच करिअर ऑप्शन्स आहेत. जे तुमची आवडही जोपासण्यास मदत करतील तसेच तुम्हाला करिअरचा नवा मार्गही निर्माण करून देतील.
पाहा कला शाखेतील करिअरच्या संधी.
B.F.A (बॅचलर ऑफ फाईन आर्टस् )
B.J.M. (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन )
B.SW (बॅचलर ऑफ सोशल वर्क )
B.A (बॅचलर ऑफ आर्ट्स )
B.El.Ed (बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन )
इंटिग्रेटेड लॉ कोर्स : लॉ अर्थात कायद्याच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा एकूण कालावधी हा पाच वर्षांचा असतो. यात विविध कायदा प्रकारच्या कायद्याच्या क्षेत्रांचा समावेश असतो. उदाहरणार्थ वनविषयक कायदे, आयपीसी [IPC], ग्राहक संरक्षण कायदा, व्यावसायिक कायदा इत्यादी.
B. P. ED (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन )
B.E.M (बॅचलर ऑफ इवेंट मॅनेजमेंट )
B.B.A. (बॅचलर ऑफ बिझनेस एॅडमिनिस्ट्रेशन ) : फक्त वाणिज्य शाखेतीलच नव्हे तर कला शाखेचे विद्यार्थी सुध्दा या क्षेत्रात करिअर घडवू शकतात.
B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )
B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया)
फॅशन डिझायनिंग
होम सायन्स
इंटिरियर डिजाइनिंग
ग्राफिक डिझाईन
ट्युरिझम कोर्स
तसेच स्वतःचा वेगळा व्यवसाय देखील करू शकतात.
बारावीनंतर वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी..
जर तुम्ही वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही सी.ए (CA) , बी.कॉम (B.com), सी.एस. फाउंडेशन (CS Foundation), बी.सीए (BCA), बी. आर्किटेक्ट (B.Arch) डी.एड पदवी (D.Ed) प्राप्त करु शकतात. याचसोबत तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स, एमबीए, एल.एल.बी. बी.एड, एम.एड पदवी प्राप्त करु शकतात. जर तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर बी.एड आणि एम.एड पदवी प्राप्त करावी.
बारावीत वाणिज्य विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, गणित आणि व्यवसाय अभ्यास या मूलभूत संकल्पनांविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. या संकल्पनांचे चांगले ज्ञान हे आपल्याला वाणिज्य क्षेत्रात आपल्या पुढील शिक्षणास मदत करेल. वाणिज्य क्षेत्रात 12 वी पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे निवडण्यासारखे बरेच पर्याय आहेत. बीबीए आणि बी.कॉम हे विद्यार्थ्यांनी निवडलेले सर्वात सामान्य कोर्स आहेत. बीबीए आणि बी.कॉम व्यतिरिक्त इतरही कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही एक उत्तम करियर बनवू शकतात. जसे की तुम्ही
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S)
बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (B.B.S)
बॅचलर मास्टर ऑफ कॉमर्स (M.Com)
व्यवसाय प्रशासन मधील मास्टर (M.B.A)
बीएड (B.ed)
आयसीडब्ल्यूए बॅचलर इन लायब्ररी सायन्स
इंपोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा
एम.सी.ए. (MCA)
एल.एल.बी. (LLB)
यांसारखे करिअर ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. तसेच, तुम्हाला डिफेन्समध्ये जायचे असेल तर तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्समधील कोणतेही एक विभाग निवडून सरकारी नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्ही आधी एनडीएची तयारी करू शकता. तसेच तुम्हाला शिक्षणात किंवा नोकरीत फारसा रस नसेल तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करू शकता.