जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एका पदकावर नाव कोरले आहे. भारताची बॉक्सर लव्हलिन बोर्गोहेनने महिलांच्या ६९ किलो गटात कास्य पदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे तिसरे पदक ठरले आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या सोबतच तिने किमान कांस्य पदक पक्क केलं होत. मात्र आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीला नमवून आपल्या पदकाचा रंग बदल्याण्याची संधी लवलीनाकडे होती. पण अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेलीने लवलीनाला 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली.
भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातलं आहे.