जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२१ । टोक्यो ऑलम्पिकमध्ये ऑगस्ट महिना भारतासाठी चांगला ठरत आहे. भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरी अर्थात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरी अर्थात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने मोठे उलटफेर करत, ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं. दिग्गज समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघावर भारतीय महिला संघाने 1-0 असा विजय मिळवला. भारताकडून गुरजीत कौरने गोल डागला.
भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या भारदस्त संरक्षण आणि आक्रमक अटॅकचे प्रदर्शन आजच्या सामन्यात दाखवलं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-0 ने हरवून भारताने बाजी मारली. गुरजीतने विजयी गोल डागला तर गोलकीपर सविताने भिंत बनून ऑस्ट्रेलियाचे हल्ले परतवून लावले.
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तिकडे भारतीय पुरुष हॉकी संघानेही सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ग्रेट ब्रिटनला हरवून भारतीय पुरुष संघ सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचं कठीण आव्हान भारतीय महिलांनी पेललं परतवलं. उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी कठीण मानला जात होता. दिग्गज आणि तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. याआधी तीन वेळेस ऑलिम्पिक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही ग्रुप स्टेजमध्ये केवळ एकच गोल खाल्ला होता. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमध्ये ७ गोल खाऊन उपांत्य पूर्व फेरीत पोहोचली होती. पण या सामन्यातील ४ क्वार्टरमध्ये ६० मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजयश्री मिळवला.
पुरुष हॉकीनंतर महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी भारतीयांच्या आशा पल्लवित करीत आहे. सध्या भारताच्या पारड्यात २ पदक आली आहे.