⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | राष्ट्रीय | भारताचा ऑलम्पिकमध्ये ‘सुवर्ण भाला’, नीरज चोप्राची पदकाला गवसणी

भारताचा ऑलम्पिकमध्ये ‘सुवर्ण भाला’, नीरज चोप्राची पदकाला गवसणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेर सुवर्ण पदक पटकावले आहे. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत.

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आज सुवर्णपदक पटकावण्यासाठी मैदानात उतरला होता. यापूर्वी झालेल्या स्पर्धेत नीरजने दुसरे स्थान पटकावत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आज नीरजकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती.

पहिल्या राऊंडमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली आहे. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे.   टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.