---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र

Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात आजपर्यंतची सर्वोच्च वाढ ; भाव वाचून फुटेल घाम

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । सध्या सुरु असलेल्या सणासुदीसह लगीनसराईच्या दिवसात अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. मात्र यातच सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आहे. सोने जीएसटीसह ९० हजार ६०० रुपयांवर पोहचले आहे. तर चांदी देखील एक लाखांच्या पार गेली आहे.

gold rate 2

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. सोन्याचे दर ९० हजार ६०० रुपये प्रतितोळा झाले आहे. तर चांदी १ लाख ४ हजार रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका मिळाला आहे.

---Advertisement---

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क आकारण्यात येत आहे. यातून जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या अनिश्चिततेत, सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे ओढा वाढल्याने सुरू असलेल्या दरातील तेजीने कळस गाठला. जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह ९० हजार ६०० रुपये प्रतितोळा झाला आहे. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment