⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | वाणिज्य | आज शेवटचा दिवस; उद्या 1 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटांचे काय होणार?

आज शेवटचा दिवस; उद्या 1 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटांचे काय होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । मे महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर लोकांना या नोटा बँकेत जमा करा किंवा त्या बदलून घेण्यास सांगण्यात आले. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत दिली होती. ती आज संपत आहे.

अशा परिस्थितीत लोकांकडे आता अवघे काही तास शिल्लक असून जेव्हा ते या नोटा बदलून घेऊ शकतात. तसेच, अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की जर एखाद्या व्यक्तीकडे 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2023 नंतर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्यांचे काय होईल? याबाबतच्या उत्तरला आरबीआयने स्पष्टीकरण दिल आहे.

याबाबत आरबीआयने म्हटले आहे की, 30 सप्टेंबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील. मात्र, या तारखेनंतर लोक 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करू शकत नाहीत किंवा बँकेतून बदलूनही घेऊ शकत नाहीत. लोक फक्त RBI मध्ये जाऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात. ऑगस्ट 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 93 टक्के नोटा परत आल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.