जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । राज्यात सध्या मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय झाला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज जळगाव जिल्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून आज पाहटपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. यामुळे पिकांना आधार मिळाला आहे.
आज या जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट ?
आज रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. मात्र जिल्ह्यात पावसाळा सुरु होऊन दीड महिना होऊन गेला तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाहीय. सध्या होत असलेल्या किरकोळ पावसामुळे पिकांना आधार तर मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात किंचितही वाढ झालेली नाहीय.
जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून आज जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
जळगांव जिल्हा दि19/ 07/2023
अमळनेर-8
बोदवड-32
भडगाव-20
भुसावळ-2.2
पाचोरा-42
जामनेर-19
चोपडा-6
चाळीसगाव-7
रावेर-2
मुक्ताईनगर-21
धरणगाव-9
यावल-13.3
एरंडोल-4